सावधान! आंब्यासोबत पोटात विष जाऊ शकते!
उदगीर - कार्बाईड नावाच्या विषारी रसायनाचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. अशा विषारी आंब्यातून प्रोटिन मिळण्याऐवजी शरीरात विष पेरले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जिवावर बेतणाऱ्या या प्रकाराकडे शासकीय यंत्रणा मात्र दुर्लक्ष करीत आहे. या रसायनाचा बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
टेंभी प्रकल्पासाठी २ दिवसांत जमीन खरेदीस प्रारंभ- झंवर
औसा तालुक्यातील टेंभी येथे होणाऱ्या नियोजित वीज प्रकल्पासाठी जमीनखरेदी दोन दिवसांत सुरू होईल. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत आल्याची माहिती भेलचे संचालक अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी दिली. केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी अवजड उद्योगमंत्री असताना जिल्हय़ात वीज प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. औसा तालुक्यातील टेंभी येथे हा प्रकल्प सुरू करण्याचा करार झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी याला संमती दिली. नियोजित प्रकल्पात काम करण्यासाठी कुशल कामगारवर्ग निवडीची प्रक्रिया आयटीआयमार्फत सुरूही झाली. मात्र, त्यापुढे प्रकल्पाची वाटचाल सुरू नव्हती. प्रकल्प होणार की नाही? याची साशंकताही वाढली होती.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
Anand Gundile
marathi kavita By-Anand Gundile आनंद गुंडीले यांच्या मराठी कवीता
जळते निखारे या काव्य संग्रहातून
1." गावचे गवत "
पूर्वी माझ्या गावात......
नांदायची शांती प्रत्येक घरात
प्रत्येक ओसरीला सुखाचे तोरण असायचे
हिंदू मुस्लीम सर्वांचे एकत्रच
दिवाळी आणि मोहरम असायचे
आंब्याच्या डहाळ्या,पांढरा कापूस,
प्रत्येक प्रहरी सूर्य बदलायचा कूस
हिरवी तूर , मुग ,हिरवाच तो हरभरा
शेतकरी राजा होई हर्षाने बावरा
डोंगर माथ्यावर छोटे देवूळ
तिथेच विठोबा अजून डौलतो आहे
रुक्मिणीशी वारकऱ्यांच्या गोष्टी
कानात अजून बोलतो आहे.....
पूर्वी माझ्या गावात..........
हरिणाचीही टोळी यायची
- Anand Ram Gundile's blog
- Login or register to post comments
- Read more
-
लातूर, उदगीरला आज वीजप्रश्नी लोकअदालत
लातूर व उदगीर येथे उद्या (रविवारी) सकाळी १० वाजता महावितरणतर्फे लोकअदालतीचे आयोजन केले आहे. अदालतीत वीजचोरी व वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येणार आहेत. लातूर विभागातील ४५७ व उदगीर विभागातील २४५ ग्राहकांना अशा नोटिस बजावल्या आहेत. संबंधितांनी लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. आर. कारंडे यांनी केले आहे.
- admin's blog
- Login or register to post comments
-
नव्या गाडय़ांची लातूरकरांना प्रतीक्षा
लातूर:लातूरहून उत्तर व दक्षिण भारतात जाण्यासाठी नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यासाठी रेल्वे अंदाजपत्रकात तरतूद करावी, ही लातूरकरांची मागणी जुनीच आहे. जिल्हय़ात सुमारे १५० किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. सुमारे ४० वर्षांच्या प्रयत्नानंतर लातूरहून मुंबईसाठी थेट रेल्वेसेवा सुरू झाली असली, तरी लातूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत. स्वतंत्र कँटीन नाही. दादरा नाही. प्रवाशांसाठी स्वतंत्र शेड नाही. लातूरहून मुंबईला रेल्वे असली तरी त्यात केवळ १७ डबे आहेत. पंधरा दिवस अगोदर आरक्षण करायचे ठरवले तरी ते मिळत नाही. डब्यांच्या क्षमतेच्या किमान दुप्पट प्रवासी नेहमीच प्रवास करतात.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
रेल्वेविषयक प्रश्नांवर ‘बरसले’ मराठवाडय़ाचे खासदार!
मराठवाडय़ातील रखडलेले रेल्वे प्रकल्प, तसेच प्रस्तावित व मंजूर रेल्वेमार्गाना चालना मिळण्यास रेल्वे अंदाजपत्रकात आता तरी नवे काही घडावे, या दीर्घकाळच्या मागणीला स्थानिक खासदारांनीही आळस झटकत हालचाली सुरू केल्या! शुक्रवारी मुंबईत रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विशेष बैठकीत रखडलेल्या रेल्वेविषयक प्रश्नांच्या फाइलवरची धूळ झटकण्यात आली. खासदारांचा हा नूर पाहून रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनीही मग आश्वासनांचा पाऊस पाडला!
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
लातूरमध्ये काँग्रेस मजबूत, राष्ट्रवादी शाबूत अन् भाजपा पराभूत
लातूर जिल्ह्य़ातील तीन पालिकांच्या निकालानंतर दोन पालिकेत प्रचंड यश मिळवून काँग्रेस जिल्ह्य़ात मजबूत असल्याचे सिद्ध झाले असून राष्ट्रवादीने आपली जिल्ह्य़ातील ताकद शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे तर राणाभीमदेवी थाटात भाषण करणाऱ्या भाजपाला मतदारांनी जिल्ह्य़ात नाकारले आहे.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
उदगीरमध्ये प्रभागफेरीने प्रचाराचा श्रीगणेशा
उदगीर - उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. सर्वच पक्ष प्रभागफेरी काढून नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून मते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
लातूरच्या वीजप्रकल्पाचे गाडे दोन वर्षांनंतरही जैसे थे!
सोलापुरात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी १३२० मेगावॉटच्या वीजप्रकल्पाचे भूमिपूजन फेब्रुवारी २००९ मध्ये केल्यानंतर मोठय़ा ईर्षेने लातूरमध्येही वीजप्रकल्प उभारणीची घोषणा करत तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि विद्यमान विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी त्याचा सामंजस्य करारही केला, पण दोन वर्षे उलटून गेल्यावरही इंधनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने या वीजप्रकल्पाचे गाडे हललेले नाही.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
पावसामुळे पिकांना जीवदान
उदगीर::औसा, शिरूर अनंतपाळ तालुके वगळता जिल्ह्य़ातील उर्वरित तालुक्यात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुटी घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल होता.
- admin's blog
- Login or register to post comments
- Read more
-
Recent blog posts
- सावधान! आंब्यासोबत पोटात विष जाऊ शकते!
- टेंभी प्रकल्पासाठी २ दिवसांत जमीन खरेदीस प्रारंभ- झंवर
- Anand Gundile
- लातूर, उदगीरला आज वीजप्रश्नी लोकअदालत
- नव्या गाडय़ांची लातूरकरांना प्रतीक्षा
- रेल्वेविषयक प्रश्नांवर ‘बरसले’ मराठवाडय़ाचे खासदार!
- लातूरमध्ये काँग्रेस मजबूत, राष्ट्रवादी शाबूत अन् भाजपा पराभूत
- उदगीरमध्ये प्रभागफेरीने प्रचाराचा श्रीगणेशा
- लातूरच्या वीजप्रकल्पाचे गाडे दोन वर्षांनंतरही जैसे थे!
- पावसामुळे पिकांना जीवदान