उदगिर,महाराष्ट्र » करीयर

१०० टक्के जॉब गॅरंटी

कमी मार्क मिळालेल्यांची शाखा म्हणून आयटीआयकडे पाहिले जात होते. पण आता उत्तम पगारासह शंभर टक्के जॉब गॅरेंटी देणाऱ्या या शाखेकडे चांगले मार्क मिळालेले विद्याथीर्ही मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. यंदाही अनेक नव्या कोसेर्सचे पर्याय निवडण्यासाठी संधी आयटीआयकडे करिअर म्हणून पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आहे.

बारावीनंतर काय? - करिअर मंत्र

बारावीनंतर कोणत्या कोर्सची निवड करावी, त्यासाठी नेमकं कोणतं कौशल्य आवश्यक असतं, कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरीची गॅरण्टी काय, विद्यार्थ्यांच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांना उत्तर मिळाली ती 'एचएससीनंतर काय?' या उपक्रमांतर्गत 'ग्रोथ सेंटर'च्या सहकार्याने आयोजित केलेल्या सेमिनारमधून.

'एमबीए सीईटी'साठी न्यूजपेपर्स वाचा

विद्यार्थ्यांनी किमान एक न्यूजपेपर नियमीतपणे वाचला तर 'एमबीए-सीईटी'ची तयारी करताना फायदा होतो. त्यातही बिझनेस पेजवर जास्त लक्ष दिलं तर सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेची तयारी होते.

मास्टर आर्ट्स

कमी गुण मिळाले की आर्ट्सला जायचं असा विचार आजही अनेक विद्याथीर् तसेच पालक करतात. पण बाय चॉइस आर्ट्स निवडून चांगलं करिअर करता येतं. यामध्ये व्यावसायिक कोसेर्स करुन पुढे चांगल्या पगाराची नोकरी करता येते. नोकरीप्रमाणेच फ्री-लान्सिंग पद्धतीनेही करिअर घडवता येतं.

बहुपयोगी कॉमर्स

सायन्स काही झेपायचं नाही आणि आर्ट्सला जायचं नाही, मग राहिला पर्याय कॉमर्सचा असा दृष्टिकोन अनेक पालक-विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. पण कॉमर्स हा इतका लाइटली घेण्याचा विषय नाही. बीकॉम करता-करता अनेक छोटे-छोटे प्रोफेशनल कोर्सेस करून तगड्या पगाराची नोकरी मिळू शकते.

सायन्सकडे चला...

बारावीनंतर आपल्याला नेमके काय करायचे आहे ते विद्यार्थ्यांनी अगोदर ठरवायला पाहिजे. पालकांनी आपले निर्णय विद्यार्थ्यांवर लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांची पसंती कशाला आहे ते जाणून, त्यानुसार कोणते पर्याय समोर आहेत याची चाचपणी करायला हवी.

प्रोफेशनल कोर्सेस शिकवणा-या संस्था

काही प्रोफेशनल कोर्सेस शिकवणा-या संस्थांची माहिती

फायदेशीर फायनान्स

कॉमर्सला अॅडमिशन घेतलं म्हणजे अकाऊण्टट होणार, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात अकाऊण्ट्स आणि फायनान्स हे करिअरच्या अक्षरश: असंख्य संधी उपलब्ध करून देणारं क्षेत्र आहे.

शिकता शिकता

बारावीनंतर सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला जातो. पण ग्रॅज्युएशन सुरू असताना दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील शिक्षण घेणं अनेकदा फायदेशीर ठरतं. बहुतांश ग्रॅज्युएशनची कॉलेजं सकाळच्या वेळात असतात. त्यामुळे उरलेल्या दिवसभराच्या वेळात आपल्या आवडीच्या क्षेत्राविषयीचं शिक्षण घेता येतं.

प्रवेशाचं नवं व्हर्जन

मागील वर्षी सुरू झालेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून काही नव्या गोष्टी समोर आल्या, तशा काही गोंधळांनाही सामोरं जावं लागलं. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेचा धसका घेतला. मात्र यंदा केलेल्या बदलांची माहिती करून घेतली तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेला सामोरं जायला हरकत नाही.

असा टाळा स्टेस

परीक्षा काळातील स्ट्रेसमुळे अभ्यास लक्षात राहत नाही. विसरायला होतं. अशा अनेक तक्रारी मुलं पालकांकडे करतात. त्यामुळे या स्ट्रेसचं काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यामुळे पालक आणि मुलांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.