उदगीर शहर म्हणजे लातूर जिल्ह्यातील एक प्रमुख नगरपालिका आहे. शिक्षण आणि शहरात असलेला पुरातन किल्ला यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. उदागिर बाबांच्या नावावरून शहराला उदगीर हे नाव पडले.
येथील बहुतांश लोक मराठी आहेत आणि शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. येथे प्रसिद्ध अशी एक डेरी फार्म सुद्धा आहे.
किला आणि पंचक्रोषीच्या अनेक किलोमिटर च्या परिसात अनेक ठिकाणी पुरातन अब्ज़र्वेशन टवर्स आहेत अनेक ठिकाणी महलांचे आवशेष सुद्धा आहेत. हा सगळा डोंगराचा भाग असून सुद्धा सारं काही भग्न आहे. कुणाचंही इकडे लक्ष नाही.असे म्हणतात की किल्ल्यावर खूप मोठाले व लांबच्या लांब असे भुयार आहेत. हे भुयार थेट बीदर व भालकी येथे निघतात.
मनोरंजनाची खूप साधने येथे उपलब्ध आहेत. मूवी थियेटर ते खेळाचे मैदान असे येथे खूप गोष्टी आहेत जे आपलं मनोरंजन करतात. येथे बार्स, पब्स, व रेस्टौरेन्ट्स सुद्धा आहेत.
उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केन्द्र आहे.
येथील लोकांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. कला ते संगीत व राजकारण ते समाजकारण, अशा प्रत्येक क्षेत्रात येथील लोकांची एक वेगळी ओळख आहे.
उदगीर शहर शिक्षणाचे सुद्धा प्रमुख केन्द्र आहे. आसपासच्या परिसरातून खूप सारे विद्यार्थी येथे शिकण्यास येतात. नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षणाच्या असंख्य सोयी येथे उपलब्ध आहे.