उदगीर,महाराष्ट्र » ईतिहास
इतिहास
udgircity history

गि शहर एक ऐतिहासिक शहर आहे. ८०० वर्षापुर्विचा किल्ला हे या शहाराच वैशिष्ठ्य आहे. हा किल्ला बहामनि राज्यकर्त्यानि बांधला. ह्याच शहरात मराठे व निजाम यान्च्यातल ऐतिहासिक युद्ध सन १७५९ साली झाल. मराठ्यानि निज़ामाचा पराभव केला आणि तह ही इथेच झाला. मराठे पेशवा सदाशिवराव भाऊन्च्या नेतृत्वात लढले आणि जिन्कले. १९५७ पर्यंत हे शहर हैदराबाद राज्यात होत. पुढे भाषा निहाय राज्यान्च्या नवीन रचनेत हे महाराष्ट्र राज्यात सामिल झाल.

भारताच्या राष्ट्रीय ध्वजासाठि लागणारा सूती कापड हयाच शहरात खादी ग्रमौद्योग मधे बनतो. हयाच कापडापासुन ध्वज बनतो व देशभर जेथे जेथे ध्वजारोहण होते तेथे तेथे हा ध्वज पोहचविला जातो. येथे ध्वजाव्यतिरिक्त साडी, कुर्ता-पायज़ामा, बेड शीट, सलवार, कुशन कवर आणि इतर खूप वस्तू तयार होतात.

गि शहर आज प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे तहसील कार्यालय आणि उप-विभागीय कार्यालय सुद्धा आहे. येथिल गुरान्चा बाजार प्रसिद्ध आहे. विशेषतः देवानी जातिच्या बैलान्साठि तर हा बाजार ख़ास प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर असलेल्या या शहाराचा विकासही वेगाने होत आहे. शिक्षण क्षेत्रात तर शहाराचा वेगळा लौकिक आहे. याच प्रमुख कारण म्हणजे येथिल शिक्षण पद्धत होय. १० वी आणि १२ वी च्या अभ्यासाची तर येथे नविच शैली विकसित झाली आहे. आणि म्हणूनच येथिल विद्यार्थी गुणवत्ता यादित वरच्या क्रमांकावर असतात. येथिल शिवाजी विद्यालय, उदयगीरी विद्यालय, आणि हवगीस्वामी विद्यालय आपल्या विशिष्ठ शिक्षण पद्धतिसाठि सम्पुर्ण देशभर प्रसिद्ध आहे.

किल्ला

गि शहर आणि तेथिल किल्ला आजसुद्धा भारतीय इतिहास आणि संस्कृतिची साक्ष् देत उभा आहे.

udgircity history

हा भुइकोट किल्ला आसून ४० फुट खोल दरिने वेढलेला आहे. किल्ल्यावर अजूनही महालांचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावर ६० फुट खोल श्री उदगिर स्वामींची समाधि आहे. त्यान्च्या नावावरुनच शहराला उदगिर हे नाव पड़ले. हा किल्ला आता लोकासाठि एक श्रद्धास्थान बनला आहे. अरबी आणि पार्शीयन भाषेत लिहीलेले शिलालेख आजही किल्ल्यावर आढळतात. शहरातली सर्वात मोठी मज्ज़िद जामिया मज्ज़िद एथेच चौबार्यावर आहे. दूसरी मोठि मक़बरा मज्ज़िद शहाराच्या मध्यात आहे.